धक्कादायक..! करोना संसर्गवाढीच्या वेगात देशातील ‘टॉप-टेन’मध्ये अहमदनगर

करोना रुग्णवाढीचा आज नवा उच्चांक; बाधितांचा आकडा ऐकून तुम्हाला बसेल धक्का

नगर- देशातील दहा शहरांमध्ये करोनाचा संसर्ग अतिवेगाने वाढत आहे. महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक असून, त्यात नगर जिल्ह्याचा समावेश झाला आहे. केंद्रीय वैद्यकीय अहवालात ही बाब स्पष्ट झाली असल्याने नगरकरांची चिंता आज आणखी वाढली.

दिल्ली व बेंगळुरु या दोन शहरांसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, नागपूर व नगर जिल्ह्यातील करोना विषाणूचा संसर्ग अतिवेगाने पसरत असल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. दरम्यान, आज नगर जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने कहर केला आहे. रुग्णवाढीचा आज नवा उच्चांक झाला असून, आज एकाच दिवशी 1 हजार 680 जणांना करोनाची लागण झाली आहे. काल एकाच दिवशी दहा जणांनी करोनामुळे प्राण सोडला. आजही 13 जण करोनाबळी ठरले आहेत.

दरम्यान, नगर जिल्ह्यात आज 1338 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 86 हजार 990 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 91.64 टक्के इतके झाले आहे. आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 1 हजार 680 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 6 हजार 714 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 677, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 514 आणि अँटीजेन चाचणीत 489 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कराना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 264, अकोले 42, जामखेड 29, कर्जत 20, कोपरगाव 01, नगर ग्रामीण 25, नेवासा 10, पारनेर 33, पाथर्डी 02, राहता 93, राहुरी 18, संगमनेर 47, श्रीगोंदा 19, श्रीरामपूर 49, कँटोन्मेंट बोर्ड 09, मिलिटरी हॉस्पिटल 14 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 143, अकोले 08, जामखेड 02, कर्जत 02, कोपरगाव 71, नगर ग्रामीण 18, नेवासा 08, पारनेर 14, पाथर्डी 05, राहाता 103, राहुरी 17, संगमनेर 55, शेवगाव 04, श्रीगोंदा 09, श्रीरामपूर 44, कँटोन्मेंट 03 आणि इतर जिल्हा 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 489 जण बाधित आढळुन आले. मनपा 26, अकोले 11, जामखेड 06, कर्जत 79, कोपरगाव 42, नगर ग्रामीण 31, नेवासा 37, पारनेर 13, पाथर्डी 56, राहाता 33, राहुरी 56, संगमनेर 03, शेवगाव 57 श्रीगोंदा 09, श्रीरामपूर 23, कँटोन्मेंट बोर्ड 04 आणि कँटोन्मेंट बोर्ड 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 457, अकोले 74, जामखेड 37, कर्जत 15, कोपरगाव 101, नगर ग्रामीण 51, नेवासा 24, पारनेर 46, पाथर्डी 30, राहाता 140, राहुरी 26, संगमनेर 148, शेवगाव 71, श्रीगोंदा 19, श्रीरामपूर 69, कॅन्टोन्मेंट 14 आणि इतर जिल्हा 16 अशा रुग्णांचा समावेश आहे.

करोना अपड्ेटस:  

बरे झालेली रुग्ण संख्या: 86990
उपचार सुरू असलेले रूग्ण: 6714
जिल्ह्यातील एकूण मृत्यू: 1218
एकूण रूग्ण संख्या: 94922

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.