भोपाळ – मध्य प्रदेशातील बरगी विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय यादव यांचा मुलगा विभोर यादव याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोट मिळाली असून, त्यात त्याने त्याचा एक मित्र वर एकटाच असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच आपले आई- वडीलही चांगले असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र त्याने एवढे टोकाचे पाउल का उचलले याचा उलगडा होऊ शकलेला नाही.
विभोर हा बारावी इयत्तेत शिकत होता. घटना घडली त्यावेळी घरात कुणीही नव्हते. पोलिसांना घटनास्थळाहून एक सुसाइड नोट सापडली आहे. याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिलेली नाही. घटना घडली त्यावेळी आमदार यादव हे बाहेरगावी होते. तर त्यांची पत्नी सीमा यादव या भोपाळला काही कामानिमित्त गेल्या होत्या.
विभोरने चार पानी इंग्रजी भाषेत लिहिलेली सुसाइड नोट घटनास्थळावर मिळाली आहे. या घटनेनंतर यादव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार बैठक सोडून रुग्णालयात पोहोचले होते.
विभोर याने आत्महत्येपूर्वी आपल्या पाच मित्रांना गुड बायचा मेसेज पाठवला होता. तुम्ही सगळे जण स्वतःची काळजी घ्या. मी निघून जात आहे, असे त्याने मेसेजमध्ये म्हटले होते.