इंदौर : महिलांवरली आत्याचाराच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीये. मध्यप्रदेशातून अशीच एक घटना समोर आली आहे. इंदौर येथे प्रियकराने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याचे समजते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱॅत कैद झाली आहे.
एका विवाहित महिलेची तिच्या कथित प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेच्या पाच वर्षांच्या मुलीसमोरच तिच्या गळ्यावर कात्रीने जोरदार वार केला आहे. या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेली महिला मदतीसाठी इकडे तिकडे धावत राहिली, मात्र मदतीसाठी कोणीही पुढे सरसावलं नाही. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीसहीत आणखी दोघांना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
संबंधित हत्येची घटना इंदौर येथील ज्ञानशिला सुपरसिटी परिसरात घडली. आरोपी सौरभ गोत्रेने गुरूवारी सायंकाळी 7 च्या सुमारास 26 वर्षीय विवाहित महिला प्रिया अग्रवालची हत्या केली आहे. यावेळी मृत महिलेसोबत तिची मुलगी देखील होती. घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेचा सर्व थरार कैद झाला आहे.
इंदौर में एक शादीशुदा महिला की उसके कथित प्रेमी ने गला रेतकर हत्या कर दी. हत्या के वक्त महिला की पाँच साल की बेटी भी मौके पर मौजूद थी. सारी वारदात घर के सामने लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई जिसके आधार पर पुलिस ने मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है. pic.twitter.com/a8bDoCXjok
— Manoj Khandekar (@manojkhandekar) January 29, 2021
आरोपी सौरभ गौत्रे हा मृत महिला प्रिया अग्रवालचा प्रियकर असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ आणि प्रिया यांच्यात प्रेमसंबंध देखील असल्याची माहिती आहे. याच कारणावरून प्रिया आणि तिचा नवरा यांच्यात सतत वाद व्हायचा. याच कारणांवरुन ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभ गोत्रेसह, त्याचा मित्र आणि भावाला ताब्यात घेतलं आहे. घटनेच्या वेळी हे दोघंही घटनास्थळी उपस्थित होते.