नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच सर्वच पक्ष एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यामधील दोघांनी स्थिती गंभीर आहे.
शुक्रवारी रात्री लग्नावरुन परतत असताना काही अज्ञातांकडून बॉम्बहल्ला करण्यात आला. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे.
West Bengal: Six BJP workers injured in a crude bomb blast, in Rampur village of South 24 Parganas district late last night. The injured workers, who are under treatment at a hospital, allege that the bomb was hurled at them by TMC workers when they were returning from a wedding. pic.twitter.com/oSE3RjPC26
— ANI (@ANI) March 6, 2021
आपण लग्नातून परतत असताना बॉम्बहल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. शोवन देबनाथ, विक्रम, अर्पण, स्वपन, महादेव अशी जखमी झालेल्यांची नावं असून यामध्ये अजून एकाचा समावेश आहे.
दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने भाजपा नेते वरुण प्रामाणिक यांनी हा बॉम्ब तिथे ठेवला होता, ज्यामध्ये त्यांचे सहा कार्यकर्ते जखमी झाले असा दावा केला आहे.