धक्कदायक, मतदानाच्या वेळी टीएमसी कामगारांवर ‘बॉम्ब हल्ला’

हल्ल्यात तीन कामगार जखमी

पश्चिम बंगाल – लोकसभा निवडणूक 2019 च्या महासंग्रमातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राज्यातील 14 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 117 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या दिग्गाजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर, देशातील काही ठिकाणी हिंसेचे देखील चित्र दिसून येत आहे.

अशातच, मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दरम्यान टीएमसी कामगारांवर बॉम्ब फेकण्यात आले आहे. ही धक्कदायक घटना मुर्शिदाबाद येथील लोकसभा भागातील दुमकाल नगरपालिका परिसरात घडून आली आहे. या हल्ल्यामध्ये तीन कामगार जखमी झाले असुन, त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुर्शिदाबादमध्ये टीएमसीचे उमेदवार अबू ताहिर खान, भाजपचे उमेदवार हुमायूं कबीर आणि कॉंग्रेसच्या अभू हेना यांच्यामध्ये लढत होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.