धक्कादायक ! भाजप आमदारावर आरोप करत महिलेने घेतले विष

मुंबईतील जुहू भागामध्ये एका महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेने आत्महत्येसाठी विषपिण्या अगोदर स्वत:चा व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये तिने जुहू येथील वरिष्ठ पीआय शशिकांत माने, भाजपचे आमदार अमित साटम आणि संजय कदम, बिल्डर किरण हेमानी यांचे नाव घेतले आहे.

मी आत्महत्या करत आहे. पोलिसांनी मला खूप त्रास दिला आहे. माझ्या मुलांचाही विचार न करता त्यांच्यावर खोटी केस केली. मी विष पिऊन आत्महत्या करते आहे. माझ्या मृत्यूला संजय कदम, अमित साटम जबाबदार आहेत. संध्याकाळपासून मी बसले होते. मला न्याय हवा आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा” अस या महिलेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


काँग्रेसनेते सचिन सावंत यांनी या महिलेचा विष घेतानाचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तसेच मुंबई पोलीस आणि राज्य सरकारने याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. 

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.