नवी दिल्ली : राजस्थानमधील जोधपूरमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या ऑडी कारने रस्त्यावरील दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अनियंत्रित ऑडी कारने रस्त्यावरील दुचाकींना एवढ्या जोरात धडक दिली कि दुचाकीस्वार चक्क हवेत उडाले. यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला बांधलेल्या झोपड्यांमध्ये घुसली. या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 जण जखमी झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
A speeding Audi car hit 11 people on AIIMS Road in #Jodhpur on Tuesday. In this a 16-year-old boy died, while 10 people were injured. A shocking video of this accident has also surfaced.@NewIndianXpress pic.twitter.com/PzUQGwGkx0
— rajesh asnani (@asnaniraajesh) November 9, 2021
आमित नागर असे ऑडी कार चालकाचे नाव आहे. आमित नंदनवन येथील रहिवाशी असून आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास एम्स रोडवरून जात असताना त्यांच्या वाहनाला आपघात झालाय. दरम्यान, रस्त्यावरून जात असताना ऑडी कारने दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला झोपड्यांत घुसली. या घटनेत 8 जण जखमी झाले असून एका जणांचा मृत्यू झालाय.
घटनेनंतर स्थानिक लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ऑडी चालक आमित नागर यांना ताब्यात घेतले आहे. तसेच जखमींना जोधपूर रुग्णालयात दाखल केले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी जोधपूरच्या चौपास्नी हाऊसिंग बोर्ड पोलीस स्टेशन हद्दीतील एम्स रोडवर एक मोठा अपघात घडला. दरम्यान, एका अनियंत्रणीत कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडींमध्ये घुसली. ज्यात एकाचा मृत्यू झालाय. तर, 8 जण जखमी झाले.
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत विमानतळावरुन थेट रुग्णालयात पोहोचले. जखमींना तात्काळ आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालया प्रशासनाला केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृत्यू झालेल्या मुकेश यांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख तर गंभीर जखमींना १ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.