मुंबई – मंत्रालयात सोमवारी एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रूपा मोरे असे या महिलेचे नाव आहे. झोपडपट्टी निर्मूलन विभागातील काही कामामुळे ती त्रस्त होती. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तिला त्वरित मागे ओढले.
या महिलेवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिला अटक करण्यात आलेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.