वडोदरा – एकाच कुटुंबातील सहा जणांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील वडोदरा येथील समा भागात ही घटना घडली आहे. कुटुंबातील सहा जणांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या सहा जणांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. तर शेजाऱ्यांच्या मते हे कुटुंब आर्थिक संकटात होते. या परिवाराने कोणत्या परिस्थितीमुळे इतके मोठे पाऊल उचलले या संदर्भातील तपास पोलीस करत आहेत. वडोदरातील स्वाती सोसायटीत हे कुटुंब राहत होते. नरेंद्र, भाविन, दीप्ती, सोनी, रिया, उर्वशी असे या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.