पुणे : महिला सरपंचाच मारहाण करुन निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना हवेली तालुक्यातील न्यु कोपरे गाव येथे घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका 31 वर्षीय महिला सरपंचाने दिलेल्या तक्रारीनूसार विकास प्रकाश अडागळे व त्याच्या आई विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी सरपंच असून त्या गावातील ड्रेनेज लाईनची कामे करुन घेत होत्या.
यावेळी विकास अडगाळे घरात बांधकामाचे पाणी येत असल्याच्या कारणावरुन कामगारांशी वाद घालत होता. फिर्यादी तेथे गेल्या असता त्यांनी प्रकाश अडगाळलेला काम थांबवल्याचा जाब विचारला. याचा राग मनात येऊन त्याने सरपंचाच शिवीगाळ करुन मारहाण केली. यामध्ये त्या खाली पडल्यावर त्यांचे कपडे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला त्याच्या आईनेही साथ दिली.