Maihar Bus Accident | मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या बस डंपरला धडकली. या घटनेत सुमारे 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर 17 ते 20 जणांचा यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या बसचालकासह अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
ही बस प्रयागराजवरून नागपूरकडे जात होती, तर ट्रक महामार्गावर उभा होता. बस प्रयागराजवरून नागपूरकडे जात असताना वाटेत रस्त्याच्या कडेला दगडांनी भरलेला डंपर उभा होता. त्यामुळे ट्रक आणि बसलची जोरदार धडक झाली. नादान देहाट पोलीस ठाण्याच्या जवळ हा अपघात घडला.
#WATCH | Madhya Pradesh: On collision of a bus and dumper in the Maihar District, Maihar SP Sudhir Agarwal says, “In this accident, 17-20 injured have been admitted to different hospitals… 6 people have lost their lives. The bus was going from Prayagraj to Nagpur… The… pic.twitter.com/XhzyH4w17L
— ANI (@ANI) September 29, 2024
या अपघातात 3 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होतात की, बसचे लोखंड गॅस कटरने कापून आणि जेसीबीच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढण्यात आले.
शनिवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान मैहर जिल्ह्यात एक ट्रक आणि एक प्रवासी बसमध्ये धडक झाली. यावेळी बसमध्ये ४५ प्रवासी होते अशी माहिती मिळत आहे. मैहरच्या नादान देहत पोलीस ठाण्याच्या परिसरात हा अपघात झाला आहे. यावेळी नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बसच्या कंडक्टरचाही मृत्यू झाला आहे.