नवी दिल्ली – तीन दिवसांपूर्वी दिल्लीतील शाहबाज डेअरी परिसरामध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. हिंदूं महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच पाकिस्तान मधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका ९ वर्षीय हिंदू अल्पसंख्याक मुलीचे अपहरण करून,
बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारून तिचे एका ५५ वर्षीय व्यक्तीशी लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सिंध प्रांतातील अल्पसंख्याक हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून घटनेसंदर्भात निदर्शने करत आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी आवाहन केले आहे.
एकाच वर्षात धर्मांतर-निकाहच्या घडल्या १२४ घटना –
भारतीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षात पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायातील मुली व महिलांचे अपहरण केल्यानंतर जबरदस्तीने धर्मांतर करून विवाह लावून देण्याचे १२४ प्रकरणे घडले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणामध्ये बहुतांशी अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
दरम्यान, ‘स्थानिक पोलीस व इतर अधिकारी अपहरणाच्या घटनांवर गांभीर्याने कारवाई करत नाही त्यामुळे हिंदू अल्पसंख्यांक समाजाच्या दु:खात वाढ होत आहे’ असे म्हणत या संपूर्ण प्रकरणावर केंद्र सरकारकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आव्हान पाकिस्तानला देण्यात आले आहे.