गुरुग्राम – हरियाणामधील राज्यातील गुरुग्राम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका खासगी शाळेत दहावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक रागावल्याने तिने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवले. वर्गमित्रांसमोर झालेला अपमान सहन न झाल्याने आणि त्यामुळे निराश असलेल्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलले.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नखं न कापणे, मोबाईल बाळगल्याने आणि मोठे कानातले घातल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित विद्यार्थीनीला वर्गमित्रांसमोर रागविले होते. तसेच तिची तक्रार पालकांकडे केली होती. तुमची मुलगी बेशिस्त वागत असून तिला शाळेतून काढून टाकण्यात येईल, असे मुख्याध्यापकांनी विद्यार्थीनीच्या पालकांना सांगितले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 एप्रिल रोजी घडली. तिच्या भावाने तिला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सर्वप्रथम पाहिले. या घटनेनंतर मृत विद्यार्थीनीच्या पालकांना भेटायला गेलेल्या तिच्या वर्गमित्रांनी देखील मुख्याध्यापकांच्या गैरवर्तनाबद्दल सांगितले. काही विद्यार्थ्यांनी तिच्या सोबत झालेल्या प्रसंगाची पृष्टी देखील केली आहे.