धक्कादायक..! खेड तालुक्‍यात “सुपर स्प्रेडर’ चाचणीतून तब्बल 110 बाधित

राजगुरूनगर  -खेड तालुक्‍यात गुरुवारी (दि. 1) घेण्यात आलेल्या 449 जणांच्या सुपर स्प्रेडर अँटीजेन चाचणीतून तब्बल 110 करोनाबाधित आढळल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. दरम्यान, खेड तालुक्‍यातील वाढत्या करोना रुग्ण संख्येला अटकाव करण्यासाठी अँटीजेन चाचण्यासह कोविड लसीकरण संख्या वाढविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

आळंदी 70 पैकी 23, चाकण 228 पैकी 39, राजगुरुनगर 124 पैकी 35 आणि शेलपिपंळगाव 27 पैकी 13 असे 110 बाधित सापडले. यातील 102 महाळुंगे आणि गुरुवारपासून सुरू करण्यात आलेल्या चांडोली कोविड सेंटरमध्ये तर 8 रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. तालुक्‍यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या अँटीजेन चाचणीतून हॉटस्पॉट गावांत 5218 पैकी 154 तर चाकण, आळंदी, राजगुरूनगर नगरपरीषदेच्या हद्दीतील 6982 पैकी 699 बाधित सापडले. आजपर्यंत तालुक्‍यात 12 हजार 200 पैकी एकूण 853 रुग्ण सापडल्याने वाढत्या रुग्णा संख्येने खळबळ उडाली आहे.

राजगुरूनगरात आता आस्थापने सील?
राजगुरूनगर शहरात अँटीजेन चाचणी करून घेण्याबाबत दुकानदारांमध्ये निरुत्साह असला तरी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत संबंधिताच्या सर्व आस्थापने सील करून बंद ठेवण्याबाबतच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.