नदीपात्रात गुपचूप कचरा टाकणाऱ्यांना दंडाचा शॉक

पुणे – नदीपात्रात गुपचूप कचरा टाकण्यात येत असल्याने नदीकाठच्या परिसरात कचरा डेपो तयार होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेकडून नदीकाठचा भाग येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांना पात्रात गस्त घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांतर्गत घोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी एका गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर कचरा टाकताना कारवाई केली. त्यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

हा कचरा प्रायव्हेट टेम्पोद्वारे सावरकर स्मारक मागील मुठा नदी पात्र, पूना हॉस्पिटल पुलाखाली नदी काठचा रस्ता येथे कचरा टाकला जात होता. त्यावेळी घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर त्यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले.

यावेळी टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता हा कचरा लक्ष्मी रस्त्यावरील ज्योती गॅस एजन्सीचा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आरोग्य निरीक्षक मांडेकर यांनी एजन्सीला सक्‍त ताकीद देत हा दंड वसूल केला.

मंडई परिसरातही केली कारवाई
अतिक्रमण विभागाकडून गोविंद हलवाई चौक ते गोटीराम भैय्या चौकदरम्यान अनधिकृत पथारी व्यावसायिक यांच्यावरही अतिक्रमण विभागाकडून रविवारी कारवाई करण्यात आली. या चौकात पथारी व्यावसायिक रस्त्यावरच बसत असल्याने शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यातच मंडई परिसरात मेट्रोचे काम सुरू झाल्याने या भागातील वाहतूकही संथ झाली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. यावेळी व्यावसायिकांनी विरोध केला. त्यानंतर पोलिसांची मदत घेत पालिकेकडून ही कारवाई सुरूच ठेवण्यात आल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.