पिंपरी (प्रतिनिधी) – दारूच्या नशेत महावितणच्या डीपीवर चढलेल्या तरुणास शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १०) पहाटे दोन वाजता शेलार वस्ती चिखली येथे घडली.
बाबासाहेब नामदेव भादार्गे (वय ३५, रा. शेलार वस्ती, चिखली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब हा दारू पिऊन मंगळवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास महावितरणच्या डीपीवर चढला.
यामुळे शॉक लागून तो गंभीररित्या भाजला. त्यास उपचारासाठी वायसीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना पहाटे चार वाजता त्याचा मृत्यू झाला. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.