सध्या करोनामुळे देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज यांचं चित्रीकरण, प्रमोशन सर्व काही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कलाकारही घरीच आहेत. मात्र या लॉकडाऊनच्या काळातही एक अभिनेत्री काम करत असून तिने नुकतंच एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे एकीकडे सारी कलाकार मंडळी घरी राहून घरातल्यांसोबत वेळ घालवत आहेत. तर दुसरीकडे मात्र दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शोभिता धूलिपाला काम करण्यात व्यस्त आहे. शोभिताने नुकतंच एका मासिकासाठी फोटोशूट केले असून त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे घराच्या बाहेर न पडता तिने हे फोटोशूट केले आहे.
शोभिताने घरी राहून “कॉस्मोपॉलिटन इंडिया’साठी फोटोशूट केले आहे.
तिने सेल्फ-शॉट कवरशूट केले आहे. इतकंच नाही तर या फोटोशूटसाठी ती स्वत:च तिची मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टालिश झाली आहे. दरम्यान, या फोटोशूटसाठी तिने स्वत:च्या मेकअप करुन हेअरस्टाइल तसंच फोटोशूटसाठी जागा आणि पोझ निवडल्या आहेत. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने घरात राहून फोटोशूट करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितले आहे.