पुढचे सरकार शिवशाहीचे : आदित्य ठाकरे

पारनेर – यात्रेत जनतेचे आशीर्वाद व खूप प्रेम मिळत आहे. एवढ्या पावसातही तुम्ही थांबले आहात, हे वलय, हे आशीर्वाद केवळ शिवसैनिकांनी केलेल्या कामांमुळे आहे. मला काहीही नको.

जनतेशी संवाद साधण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. शिवसेनेचे आमदार, पदधिकारी खूप चांगले काम करत आहेत. माझ्यावर जे संस्कार झाले आहेत, त्या प्रमाणे जनतेमधल्या देवास मी नमस्कार करण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले. पारनेर तालुक्‍यातील ढोकी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत असलेल्या नदीवरील पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी होते. यावेळी पर्यावरणमंत्री  , आमदार शरद सोनवणे, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, या पाच वर्षांत जिथे जनतेवर अन्याय होतो, तेथे रस्त्यावर उतरलो व प्रश्न मार्गी लावले. लोकसभेमध्येही आपण शिवसेनेला खूप मते दिली. याचे आभार देखील या यात्रेतून मानत आहे. शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की तो निवडणुकांना महत्व देत नाही. पुढचे सरकार हे शिवशाहीचे सरकार असणार आहे. मला नवीन महाराष्ट्र घडवयाचा आहे.

ना. औटी म्हणाले, या पुलाचे खोटे नारळ कॉंग्रेसने खूप वेळा फोडले. परंतु सरकार बदलले आणि हा चार कोटी रुपयांचा पूल तयार झाला, ही ढोकेश्वर महाराजांची कृपा आहे. न होणारी विकासकामे आम्ही करून दाखवली. पुलाच्या उद्‌घाटनाला ठाकरे यांचे नाव लागले, याचा मनस्वी आनंद होत आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव, रासप तालुकाध्यक्ष गंगाधर कोळेकर महिला आघाडी उमाताई बोरुडे डॉ. वर्षा पुजारी सुनीता आहेर, बाबासाहेब तांबे अनिकेत औटी, गणेश शेळके, चंद्रभान चिकणे, डॉ. श्रीकांत पठारे, अशोक कटारिया, किसनराव सुपेकर, सरुबाई वाघ, संतोष येवले, जयसिंग धोत्रे, सुनीता मुळे, ताराबाई चौधरी, अनिकेत देशमाने, अप्पासाहेब शिंदे, बबनराव पायमोडे, अमोल रोकडे, अंकुश ढवळे, सुनीता झावरे, शिवाजी बेलकर, सचिन गोडसे, नीलेश खोडदे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.