शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार

पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यात एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

यावेळी सर्व प्रथम राज यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वाद घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पुष्पगुच्छ आणि पगडी घालून शिवशाहीरांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

“आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस. आज ते100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘मनसे परिवारा’च्या वतीने चिरतरुण शिवशाहिरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.” अश्या भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या. या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा राज ठाकरेंनी सोशलमिडीयावर शेअर केली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे घराण्याचं नातं हे गेल्या काही दशकापासूनचं असल्याचं संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष जिव्हाळा होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.