शिवशाही बसला लागली आग

कात्रज घाटातील प्रकार : 29 प्रवासी सुखरूप

कात्रज – स्वारगेटहून कोल्हापूरला जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागली. या बसमध्ये 29 प्रवासी होते. आग लागल्यानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आर्यन स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी व भारती पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय धुमाळ व कात्रज पोलीस चौकीचे पोलीस शिपाई जाधव व खेडेकर यांनी बसचा दरवाजा तोडून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. हा प्रकार आज सकाळी 10. 15 वा. सुमारास कात्रज घाटामधील निसर्ग हॉटेलच्या समोरच्या वळणावर घडला.

आगीमध्ये शिवशाही बसचे खूप नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर बसचे दरवाजे लॉक झाले आणि प्रवासी आतमध्ये अडकले होते.

या घटनेची माहिती कळताच कात्रज अग्निशमन दलातील एक बंब घटनास्थळी लगेच दाखल होऊन आग दहा मिनिटांत विझवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बसमधील प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढून सुटका केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.