दुर्गामाता दौडीतून जामखेड शहरात अवतरली शिवशाही

जामखेड  – शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, वेडात मराठे वीर दौडले सात, जय जय महाराष्ट्र माझा, जय भवानी जय शिवाजी, भारत मातेचा जयजयकार करत संपूर्ण नऊ दिवस पहाटे पाच वाजता जामखेड शहरात शेकडो तरुण भगवे ध्वज घेऊन जामखेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथून दैड सुरुवात करून लोहारदेवी येथे आरतीसाठी जातात.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने जामखेड शहरात श्री दुर्गामाता दौड निघते. भल्या पहाटे निघणाऱ्या दौडीतून शांतता व शिस्तबद्ध फेरीमुळे शिवशाही अवतरल्याचे चित्र जामखेड करांना पहायला मिळत आहे. या दौडीला तरुणांसह थोरा-मोठ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका प्रमुख श्री पांडुराजे भोसले म्हणाले, हे कार्य देव, देश, धर्म व तरुणांना व्यसनापासून दूर करण्यासाठी, तसेच तरुणांना शिवरायांच्या इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी व सर्वांचे संकटापासून रक्षण व्हावे, हे मागणे आई जगदंबेच्या चरणी करण्यासाठी ही दौड निघते. या दौडीचा समारोप 8 ऑक्‍टोबर रोजी दुपारी चार वाजता होईल. यावेळी दुर्गामाता मंदिर बाजारतळ येथून निघून लोहारदेवीची महाआरती करून शस्त्र पूजन व देवीच्या माळावर रावण दहनाचा कार्यक्रम होईल, तरी सर्वांनी उपस्थित राहावे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.