पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी

मुंबई : पुणे-नाशिक महामार्गावर आज सकाळी मोठा अपघात घडला आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. बघता बघता ही आग इतकी वाढली की संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी आली. पुणे – नाशिक महामार्गावर चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती इथे ही दुर्घटना घडली आहे.

आग लागताच बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यामुळे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये त्यावेळी 40 प्रवासी प्रवास करत होते. मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.