लोकसभेच्या उपाध्यक्षपदाची शिवसेनेची भाजपकडे मागणी

मुंबई – लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना व भाजप युतीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला असून राज्यातील एकूण ४८ लोकसभा जागांपैकी ४१ जागांवर युतीने भगवा फडकावला आहे. देशभरातील लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या उत्तुंग यशानंतर नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले असून मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला एक केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे.

अशातच आता शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेने भाजपकडे लोकसभेच्या उपसभापती पदाची मागणी केली असल्याची माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्या भेटीसाठी जाणार असल्याची देखील माहिती दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.