सर्जिकल स्ट्राईकचं उदो उदो करणं थांबवा – शिवसेना

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी दोन वर्षापूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. पण सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरील कारवाया काही थाबंल्या नाही. अशातच भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तान सुधारले नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, असे म्हटले आहे.

पण आधी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान सुधारलं नाही, उलट पाकिस्तानकडून अधिकच खुरापती वाढल्या आणि भारतीय जवान शहिद होण्याची संख्या वाढली. रमजान महिन्यांत शस्त्रसंधीच उल्लंघनही पाकिस्तानकडून करण्यात आलं होतं. पण पहिल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानचे शेपूट सरळ झाले नसेल तर दुसऱ्या स्ट्राईकची धमकी कशासाठी? सर्जिकल स्ट्राईकचा उदो उदो करत  राजकारण करणे थांबवा, असा अप्रत्यक्षरित्या टीका शिवसेनेने केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या संरक्षणमंत्री निर्मला सीतरामन या राफेल घोटाळाप्रकरणी वकिली करण्यात अडकून पडल्याने लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिलेला आहे. पाकिस्तानचे शेपूट हे कधीही सरळ होणार नाही. तरीही आमचे राज्यकर्ते पाकबाबतीत इतके आशावादी कसे असू शकतात? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे.

तसेच पुढे म्हटले आहे की, सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच झाला होता व त्याच सर्जिकल स्ट्राईकचा विजयोत्सव साजरा करून भाजपने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. भाजपने निवडणुका जिंकल्या, पण सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडा मिळाला काय? सर्जिकल स्ट्राईकनंतर कश्मीरात पाक पुरस्कृत हिंसाचार वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानचे हल्ले व आपल्या सैनिकांची बलिदाने वाढत आहेत.

कालच सर्जिकल गेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो संदीप सिंह चकमकीदरम्यान शहीद झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱया वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यात सहभागी असलेला आमचा एक बहादूर जवान दहशतवाद्यांशी लढताना शहीद होत असेल तर कसे व्हायचे? आता या सर्जिकल स्ट्राईकचा दिवस शौर्य दिवस, विजय दिवस साजरा करा असे आदेश म्हणे विद्यापीठांना देण्यात आले. जवानांच्या शौर्याचा सन्मान करण्याची ही कसली पद्धत?

भारतीय जवानांना पाकिस्तानच्या हद्दीत घूसून त्यांना धडा शिकवण्याचा आदेश हवाय, पण मागील सर्जिकल स्ट्राईकचा उदोउदो करत राजकरण केले जाणे म्हणजे हा जवानांचा अपमानच आहे. लोकसभा निवडणूकींचा माहोल निर्माण करण्यासाठी असे अाणखी स्ट्राईक केले जातील किंवा एखादे छोटेसे युध्द देखील केले जाईल पण यामध्ये भारतीय जवानांनाच बलिदान द्यावे लागेल. पाकिस्तान विषयाचे राजकरण केले जात आहे. सर्जिकल स्ट्राईकने प्रश्न संपला नाही. त्यामुळे पुढचे कठोर पाऊल उचलणे देशहिताचे आहे व त्यासाठी 56 इंचाच्या शूर छातीचे दर्शन जनतेला घडायला हवे. लष्करप्रमुखांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत केलेले वक्तव्य हे हतबलतेतून आले आहे काय?  असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे.

दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक झाला, पण कश्मीरमधील स्थिती पाकिस्तानी नेतृत्वाला सुधारू द्यायची नाही. कश्मीरमध्ये आयएसआयच्या कारवाया वाढल्या आहेत असे लष्करप्रमुख सांगतात. ही त्यांची वेदना आहे. हिंदुस्थानला घायाळ करण्याचा चंगच पाकिस्तानने बांधला आहे. कश्मीरमध्ये अशांतता, रक्तपात घडवला जात असून तरुणांना ‘दहशतवादी’ बनवले जात आहे, असेही आमच्या लष्करप्रमुखांनी सांगितले. पाकिस्तानचे हे नापाक उद्योग एखाद्या सर्जिकल स्ट्राईकने थांबतील काय? सर्जिकल स्ट्राईक हा शत्रूला अचानक धक्का देण्यासाठी केला जातो. पण अशा धक्क्याने डोके ताळय़ावर येईल ते पाकिस्तान कसले! आपल्या लष्करप्रमुखांचा आशावाद दुर्दम्य आहे, पण पाकिस्तानकडून आशा बाळगता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण चालले आहे. ते थांबले तरी पुरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)