काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यावेळी शिंदे सरकारने आपले बहुमत सिद्ध केले. त्यानंतर सभागृहात झालेल्या भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. शिवसेनेनेही हे शिंदे सरकार सहा महिनेच सत्तेत असेल असं म्हटलंय. मुखपत्र सामनामधून शिवसेनेने शिंदे सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
पक्षाचा आदेश झुगारून मतदान करतात. न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत. अशा बेकायदेशीर लोकांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे व त्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे पद स्वीकारून आपल्यापेक्षा कनिष्ठ नेत्याची भलामण करणे हेच फडणवीस यांच्या राजकीय प्रतिष्ठेचे लक्षण समजायचे काय?,” असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण ? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे, असा टोलाही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावलाय.
फडणवीसांनी सांगितला नवीन ED चा अर्थ
सभागृहात विरोधकांच्या ईडीबाबतच्या आरोपाला फडणवीस यांनी चातुर्याने उत्तर दिलं. आमच्याकडे आलेले लोक ED मुळेच आलेत हे खरं आहे पण
ही ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात आरोप प्रत्यारोपांची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.