बेल्हे – शिवसेना नेते माजी जिल्हा परिषद सदस्य, बेल्हे गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच राजाभाऊ गुंजाळ (वय-56) यांचे आज (ता. 15) पहाटेच्या सुमारास ऱ्हदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजाभाऊ गुंजाळ यांचा परिसरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यात मोलाचा सहभाग होता. ते शिवसेनेचे कट्टर समर्थक होते. शिवसेना पक्षवाढीसाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
राजाभाऊ गुंजाळ यांनी पूर्वीच्या काळी जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच जुन्नर पंचायत समितीचे सभापती म्हणूनही यश्वस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती.