शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही; तलवारीची धार कायम : सामानातून स्पष्टीकरण 

मुंबई – चार वर्षात शिवसेना-भाजपमध्ये सूर असलेल्या निरर्थक शाब्दिक युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला. सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चाणक्य नीतीचा वापर करत भाजप-सेनेची युती केली. मात्र गेल्या ४ वर्षातील शिवसेनेनेची भूमिका भाजप विरोधात होती. शिवसेनेने भाजपवर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली होती. आणि आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचेही वेळोवेळी ठासून सांगितले होते. मात्र भाजप-सेना युतीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजकीय नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली भूमिका ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडली आहे.

शिवसेना हे अडगळीतले भांडे कधीच नसल्याने सत्य, देशहित व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमचे भांडे भांड्यास लागून वाजत राहिले व खणखणीत नाणे गाजत राहिले. दबाव आणि मुस्कटदाबी ही भुते आम्ही शिवसेनेच्या मानगुटीवर कधीच बसू दिली नाहीत. आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही. तसेच आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही, असे शिवसेनेने अग्रलेखातून स्पष्ट केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)