परभणीत शिवसेना नगरसेवकाची हत्या; गुन्ह्यानंतर आरोपींनी गाठले पोलीस स्टेशन

परभणी : वैयक्तिक वादातून शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. परभणी शहरातील जायकवाडी वसाहत परिसरातील ही घटना घडली आहे. दोन अज्ञात आरोपींकडून कुऱ्हाडीने वार करत अमरदीप यांची हत्या केली असल्याचे समजते आहे.

आरोपी आणि अमरदीप रोडे यांच्यामध्ये वैयक्तिक वाद होते. आणि त्याच रागात आरोपींनी अमरदीप यांची हत्या केली. सर्वात धक्कादायक म्हणजे अमरदीप यांची हत्या करून आरोपींनीच पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हाची कबुली दिली. यानंतर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.