मराठा आरक्षण समर्थनात राष्ट्रवादी व शिवसेना आमदारांचा राजीनामा 

मुंबई: भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर हर्षवर्धन जाधव या शिवसेना पक्षाच्या आमदारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. कन्नड विधानसभेचे आमदार असलेले हर्षवर्धन जाधव हे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई असून त्यांनी याअगोदरच मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांना आपला राजीनामा ईमेल द्वारे पाठवला असून उद्या प्रत्यक्ष भेटून राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे सांगितले आहे.
विजापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे हे विजापूर विधानसभेतील कन्नड गावचे रहिवाशी होते, त्यांच्या मृत्यूमुळे आपल्याला अतीव दुःख झालं असून मराठा समाजाचा आत्मसन्मान लक्षात घेऊन आपण राजीनामा देत असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)