शिवसेना नेहमी सत्याची बाजू घेणारा पक्ष ; आमचा विरोध सरकारी धोरणांना होता- संजय राऊत

मुंबई: शिवसेना-भाजप यांनी आगामी नुकतीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. दरम्यान, भाजपवर तीव्र शब्दात टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत युतीवर स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत म्हणाले,  शिवसेना नेहमी सत्याची बाजू घेणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. आमचा विरोध सरकारी धोरणांना होता. तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्मार्ट सिटी किंवा उद्योगधंदे सुरु करु देणार नाही. म्हणून आम्ही भूसंपादन कायद्याला विरोध दर्शवला. बुलेट ट्रेन प्रकल्पात शेतकऱ्यांची जमीन जाणार असल्याने आमचा या प्रकल्पाला विरोध आहे.

राऊत पुढे म्हणाले , विद्यमान भाजपा ही आधीसारखी भाजपा नाही. सध्याच्या भाजपामधील अर्ध्याहून अधिक नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आले आहेत. त्यांना पक्षात घेतले म्हणजे शिवसेनेची जागा मिळवता येईल, असे होणार नाही. राज्यात भाजपा कधीही शिवसेनेची जागा घेऊ शकत नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)