पुणे : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. यादरम्यान दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षानेही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. आज पुण्यात शिवसंग्राम पक्षाची सर्वसाधारण सभा पार पडली. ज्योती मेटे याच्या अध्यक्षेतेखाली ही सभा पार पडली. राज्यातील सर्व सभासद या सभेला उपस्थितीत होते.
सभेत काय चर्चा झाली?
शिवसंग्राम पक्षाच्या सभेत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शिवाजी महाराज स्मारक आणि मराठा आरक्षण यावर चर्चा झाली असून याबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ज्योती मेटे यांची निवड करण्यात आली. शिवसंग्राम किमान 5 विधानसभा जागा लढवणार आहेत. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आणि कायदेशीर आरक्षण जे कोण देईल त्यांच्यासोबत जाऊ, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
शिवसंग्राम विधानसभेत 5 जागा लढवणार
शिवसंग्राम विधानसभेत 5 जागा लढवणार लढवणार आहेत. मुबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी त्यांना ५ जागा पाहिजे आहेत. तसेच ज्योती मेटे स्वतः निवडणूक रिंगणात उतरणार असून बीड मधून चाचपणी सुरू असल्याचे समजत आहे. आम्ही निवडणुका ज्या ठिकाणी जिंकेल असं वाटतं त्याच ठिकाणी लढवणार आहोत असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.