भगवा फडकवण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बेळगाव जिल्ह्यात भगवा ध्वज फडकवला

बेळगाव : महाराष्ट्रˆ-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी करत बेळगावकडे निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या सीमेतच रोखल्याचा दावा आंदोलकांनी केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडले. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

बेळगाव महापालिकेसमोर कन्नड रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज अनधिकृतरित्या लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. ठरल्याप्रमाणे शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होण्यासाठी निघाले. कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकवणारच असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.
दरम्यान आंदोलकांना बेळगावात प्रवेश न देता पोलिसांनी शिनोळी -जवळ महाराष्ट्रˆ-कर्नाटक सीमेवरच रोखलं.

सीमेसह महापालिका परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी महानगरपालिका कार्यालयाकडे जाणारे रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. महापालिकेकडे जाणार्‍या व्यक्तीची पूर्ण चौकशी करून सोडले जात आहे. वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगावचे जिल्हाधिकारी यांच्यात बैठक सुरू आहे. महापालिकेसमोर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे लावलेला वादग्रस्त ध्वज काढण्यासाठी चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बेळगाव जिल्ह्यात भगवा ध्वज फडकवला आहे. बेळगाव पोलिसांना चकवा देत कोनेवाडी गावात शिवसैनिकांनी भगवा फडकवला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.