वाघोली – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणत्याही अटीशिवाय साजरी करू देण्याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व हवेली तालुक्याच्या वतीने देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुठलेही नियम व अटींचे बंधन न घालता उत्साहात साजरी करण्याची परवानगी मिळावी, तसेच करोनासारख्या महामारीच्या काळामध्ये सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असताना लग्न, उद्घाटन समारंभ, सरकारी कार्यक्रम, सर्व छोटे- मोठे व्यवसाय नियम व अटींचे पालन न करता पूर्वपदावर सुरू आहेत.
तरी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याकरिता नियम व अटींचे बंधन का, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी बिनशर्त परवानगी द्यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सदस्य गणेश बापू कुटे, युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस संदीप सातव, लोणीकंद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवींद्र कंद, भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील, भाजप क्रीडा तालुकाध्यक्ष विजय जाचक, हवेली तालुका युवा मोर्चा सरचिटणीस गौरव झुरुंगे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.