लोककलेचे दर्शन घडविणारे ‘शिवराज्यभिषेक’ गीत

मुंबई – मराठी अभिनेता ‘प्रसाद ओक’ सिनेरसिकांसाठी लवकर एक सुंदर विषयावर चित्रपट घेऊन येणार आहे. ‘हिरकणी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी प्रसादने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हिरकणी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे.

दरम्यान, त्यातच प्रसाद ओक चित्रपटाबाबत आणखी एक सरप्राइज घेऊन आला आहे. नऊ कलाकार आणि सहा लोककलांमधून ‘शिवराज्यभिषेक’ गीत सादर करणार आहे. नुकताच या गीताचा ऑफिशल टीझर लाँच करण्यात आला आहे. या ऐतिहासिक गीतातून अभिनेता चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ चांदेकर, राहुल रानडे, सुहास जोशी आणि क्षिती जोग यांची झलक पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

९ कलाकार… ६ लोककलांमधून… छत्रपती शिवरायांना देणार मानाचा मुजरा… शिवराज्याभिषेक गीत येत आहे उद्या… #ShivRajyabhishekGeet Coming Tomorrow #हिरकणी #Hirkani #24Oct @iradaentertainment in association with @mapuskar (MAGIJ Picture) Presents Director – @oakprasad Writer – @chinmay_d_mandlekar Creative Producer – @mapuskar Co Producer – @lawrence.dsouza.794 Producer – Falguni Patel @manjiri_oak @memanesanjay @amitrajmusic @sidchandekar @jitendrajoshi27 @hemantdhome21 @kshiteejog #SuhasJoshi @shrotripushkar @ranade.rahul @priyadarshanjadhavv @rohanmapuskar @sandeepkhareofficial #IllusionEthernal @narendrabhide @ratnakant_jagtap #sanjaykrishnajipatil @chitrapandhari_12_6_19 @studiolink11 @sunshinezstudio @swaroop_recreationmediapvtltd @sachin_narkar_swaroop @aakashpendharkar @vikaspawar0310 @darshanmediaplanet @zeemusicmarathi @rajshrimarathi @vizualjunkies

A post shared by Hirkani The Film (@hirkanithefilm) on

‘हिरकणी’  हा चित्रपट येत्या दिवाळीत 24 ऑक्टोबरला संपूर्ण महारष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.