‘मराठी मातीत जन्मणाऱ्यास शिवराय आपोआपच समजतात’

भाजपचे नेते जालींदर कामठे यांचे प्रतिपादन

कोंढवा – मराठी मातीत जन्म घेणाऱ्या प्रत्येकाला शिवराय सांगावे लागत नाहीत, ते आपोआपच समजतात, ओळखता येतात हेचं त्यांचे मोठेपण आणि आपलेपण आहे. शिवचरित्र हे प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. ते प्रत्येकाच्या घराघरात व मनामनात कायम अधिराज्य करत राहील, असे प्रतिपादन पश्‍चिम महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जालींदर कामठे यांनी केले.

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला कामठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रसंगी भानुदास रिठे, हेमंत जाधव, पुष्पा झेंडे, वैशाली सोमवंशी, आरती खलाटे, सुनिता जाधव, सपना कबाडी, कविता काळे, दिपाली गायकवाड, शारदा गायकवाड, दीपक सातव, सुधीर कबाडी, संभाजी साबळे, रामचंद्र वसेकर, विजय गोपाळे, ज्ञानेश्‍वर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

फरसुंगी – फरसुंगी गाव, गावठाण, भेकराईनगर परिसरातही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणेशोत्सव मंडळ, सामाजिक संस्था तसेच विविध गृह निर्माण सोसायट्यांमध्ये कार्यक्रमांची रेलचेल दिसली. करोनाच्या पार्श्‍वभुमीवर मिरवणुका टाळण्यात आल्या तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर देण्यात आल्याचेच चित्र सर्वत्र दिसत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.