नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केलेले नगरचेमाजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय 36) यांना पुन्हा एकदा तोफखाना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, 9 जुलै 2021 रोजी दुपारी 12.30 दरम्यान नगर जिल्ह्यातील दिल्ली गेट भागात ज्युस सेंटर चालकाला माजी महापौर श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांनी दमदाटी करत जातीवाचक शिविगाळ केली होती. त्यानंतर ज्युस सेंटर चालकाने पोलिसात धाव घेतली. प्रकरण कोर्टात पोहचल्यानंतर छिंदमने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. यानंतर तोफखाना पोलिसांनी छिंदमला अटक केली आहे.