#लोकसभा2019 : शिवपाल यादवांच्या प्रगतिशील समाजवादी पक्षांची आणखी एक यादी जाहीर

लखनऊ – शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पक्षाने (लोहिया) 14 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्तर प्रदेशसह बिहार, हरियाणा आणि राजस्थान येथील उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

शिवपाल यादव यांनी या यादीत उत्तर प्रदेशातील बांदा आणि हरियाणातील भिवानी महेंद्रगड याठिकाणी उमेदवारीत बदल केला आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथून पहिल्यांदा सुनीता देवी यांना उमेदवारी देण्यात आली होती आता त्याठिकाणी छोटे लाल यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भिवानी महेंद्रगड येथे सीमा यादव याच्यांऐवजी शैलश कुमार यांना तिकिट देण्यात आले आहे.

उमेदवारांची नावे –

उत्तर प्रदेश – देवरिया – विनय कुमार सिंह अमेठिया
राजस्थान – अलवर – अनूप कुमार मेघवाल
बिहार – बक्सर – रविराज
बिहार – आरा – अनिल कुमार सिंह
बिहार – सासाराम – निर्मला देवी
बिहार – मुजफ्फरपुर – एहलेशामुल हसन रहमानी
बिहार – मधुबनी – खलीफ अंसारी
बिहार – जहानाबाद – अरविन्द प्रसाद सिंह
हरियाणा – रोहतक – मंजू देवी
हिरयाणा – हिसार – रजत कलसन
हरियाणा – भिवानी महेंद्रगढ़ – शैलेश कुमार
हरियाणा – करनाल – नरेश कुमार
हरियाणा – सिरसा – हीरा सिंह

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.