चिंबळी -शिवजयंती निमित्त चिंबळी फाटा (ता. खेड) येथील शांताई मेमोरियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवनेरीगडावर स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक वारसा जपण्याचा संकल्प केला.
यामध्ये स्वाती जैद, प्राजक्ता कांबळे, प्रियंका आतोले, सरस्वती कुदकी, नीलम जगताप, अर्चना पाटील, कल्याणी बोडके, श्रेया बोधुले, परवीन शेख, योगिता काळे, संगीता लाकूडजोदे, वैशाली लांडे, सरस्वती पंचाळ, रोहित कांबळे आदी शिक्षकांसह 4 थी ते 8वीच्या असे 50 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी झाले होते, असे शाळेच्या प्राचार्या प्रिया बवले यांनी सांगितले.