#shivjayanti : येत्या शिवजयंतीला सयाजी शिंदे लावणार गडकिल्यांवर हिरव्या मशाली

पुणे – आपलं जगणं हे झाडांच्या ऑक्सिजनमुळे आहे. म्हणून या झाडांना जपलं, तर आपण जगू. एक आपलं झाड, त्याची आपणच करायची वाढ ही संकल्पना घेऊन लाखो झाडे लावणारे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टील अष्टपैलू अभिनेते ‘सयाजी शिंदे’ यांच्या संकल्पनेतून येत्या शिवजयंतीला म्हणजेच १९ फेब्रुवारीला गडकिल्यांवर वृक्ष लागवड होणार आहे.

महाराजांच्या पाच गडांवर ४०० हिरव्या मशाली लावण्याचा निर्धार सयाजी शिंदे केला आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते तयारी करत असून अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आहे. मिरवणूक काढून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन लोकांना वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भातील एक व्हिडीओ सयाजी शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.