Shivendrasinhraje Bhosale – स्व. भाऊसाहेब महाराजांनी जुन्या- नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून सातारा तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले. आजही संपूर्ण तालुक्यात ‘भाऊसाहेब महाराज गट’ भक्कम आहे तो फक्त जुन्या- नव्या कार्यकर्त्यांमुळेच! कार्यकर्ता हा नेता आणि जनता यांच्यामधील दुवा असून जनतेच्या समस्या सोडवण्यामध्ये कार्यकर्त्यांचाही मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. येथील हॉटेल राधिका पॅलेस येथे स्व. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ कार्यकर्ते आणि सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बडेकर यांनी आयोजित केलेल्या जुन्या- नव्या कार्यकर्त्यांच्या सत्कार सोहळ्यात ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी बडेकर यांच्यासह नगराध्यक्ष अमोल मोहिते, सभागृह नेता अविनाश कदम, नगरसेविका सावित्री बडेकर, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई, माजी नगराध्यक्ष अशोक मोने, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, पत्रकार विनोद कुलकर्णी, हरीश पाटणे, सतीश बुद्धे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी लालासाहेब पवार, हेमंत कासार, ऍड. दिलावर मुल्ला, रामभाऊ जगदाळे, सतीश चव्हाण, डॉ. अच्युत गोडबोले, विठ्ठलराव जाधव, गुलाब भोसले आदी मान्यवरांचा ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध मान्यवरांनी स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाला नगरसेवक अक्षय जाधव, सुजाता गिरी गोसावी, सीमा भोसले, विश्वतेज बालगुडे, जयवंत भोसले, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, माजी नगरसेवक शकील बागवान, जगन्नाथ किर्दत, राजेंद्र कांबळे, उद्योजक प्रवीण नवले, विशाल पाटील, योगेश चोरगे, दीपक चोरगे, हेमंत गुरव, चिकू बडेकर, सुनील भोसले, गणेश दाभाडे, पाटील साहेब, दादा जगदाळे, दीपक ढगे, सुरेश शिर्के यांच्यासह विविध मान्यवर, आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.