Shivendrasinhraje Bhosale : भाजप हा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणारा पक्ष असून, विरोधकांकडे केवळ दिशाहीन राजकारण उरले आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपशिवाय कोणताही पर्याय नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विजयाचा निर्धार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. तसेच कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागठाणे गटातील भाजपचे अधिकृत उमेदवार अजित साळुंखे, नागठाणे गणाचे उमेदवार राजेंद्र ढाणे आणि अतित गणातील उमेदवार सुषमा जाधव यांच्या प्रचार शुभारंभानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. सभेत बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजना केवळ कागदावर न राहता तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचल्या आहेत, हे भाजप सरकारचं मोठं यश आहे. त्यामुळे जिल्हा परिषद गट व गणातील सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने ताकदीनिशी काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी आमदार मनोज घोरपडे यांनी नागठाणे व अतित गणातील आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. “रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांना येत्या काळात अधिक गती देण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून देणं ही काळाची गरज आहे. मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये,” असे आवाहन त्यांनी केले. या सभेला लालासाहेब पवार, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, संचालक जयवंत कुंभार, बजरंग जाधव, जयवंत साळुंखे, बबन साळुंखे, सुरेश माने, राजाराम जाधव, उध्दव यादव, जालिंदर आवळे, अॅड. धनाजी जाधव, मधुकर यादव, विष्णू साळुंखे, अनिल साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागठाणे ते सासपडे आणि नागठाणे ते मांडवे हे नागठाणे गटातील प्रमुख रस्ते आहेत. हे दोन्ही रस्ते पुरेशा रुंदीकरणासह सिमेंट काँक्रीटचे करण्यात येतील, असा शब्द मी या प्रचार सभेत देतो. फक्त मतदारांनी मतरूपी आशीर्वाद भाजप उमेदवारांना द्यावेत. – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले नागठाणे येथे झालेल्या प्रचारसभेत उमेदवारांसोबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे व मान्यवर. हेही वाचा : ZP Election 2026: जिल्हा परिषदेसाठी शिवेंद्रसिंहराजेंचा ‘मास्टर प्लॅन’; पण ‘या’ नेत्याच्या चालीमुळे महायुतीत पेच वाढणार? Anjali Bharti on Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांबद्दल प्रसिद्ध गायिकेची गलिच्छ भाषेत टीका; भाजप नेत्यांसह किशोरी पेडणेकरही भडकल्या