अवधूत तटकरेंच्या हातावर शिवबंधन

मातोश्रीवर कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश 

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे रायगडात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अवधुत तटकरे यांनी मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीला पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक धक्के बसले आहेत. त्यानंतर आता विदर्भातही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू झाले आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित दोन दिवसात समीर देशमुख यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून कार्यकर्त्यांशी पक्षबदलाबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार यांच्याशी एकदा चर्चा झाली होती. माझ्या व्यथा मी त्यांच्याकडे मांडल्या होत्या. पण मी पक्षबदलाच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो. मी कोणावरही नाराज नाही. राजकीय महत्वकांक्षा काहीशी आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी पक्षात आलेलो नाही. तर काकांशी पक्षबदलाबाबत काहीही बोलणे झालेले नाही, अशी प्रतिक्रिया अवधूत तटकरे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.