मुंबई – सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कॉमेडी वाटला म्हणून अनेक जण व्हिडीओ शेअर करतात तर काहीतरी हटके आहे म्हणून लोक व्हिडीओ शेअर करतात. कधी काही ब्लॉगर ठरवून एखादा व्हिडीओ काढतात तर कधी कधी नॅचरल पद्धतीने एखादी गोष्ट कॅमेऱ्यात कैद करतात. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे चिमुकल्याचा स्टाईल पाहून अनेकजण वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत.
तसे तर सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील बहुतांशी हे लग्नातील असतात. अशात जर नाचताना एखाद्यान काही अतरंगीपणा केला असेल तर व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो. या चिमुकल्याच मात्र तस नाही. साउंडवर जोरात छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं सुरु आहे आणि चिमुकला आपल्या तोऱ्यात नाचताना दिसत आहे. ‘आपण आपल्याच नादात’ या कॅप्शनखाली हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
View this post on Instagram
‘शिवरायांच्या बुद्धीचा लागणा पार’ हे शब्द कानी पडताच चिमुकल्याने दिलेले एक्सप्रेशन कमालीचे भन्नाट आहेत. एकच एक्सप्रेशन देऊन हा पट्ठ्या थांबत नाही तर आपली कॉलर उडवण्याचा देखील प्रयत्न करतोय. दोन्हही हात हलवत चिमुकल्याने केलेला ३० सेकंदांचा हा डान्स सगळ्यांना आकर्षित करतोय. म्हणूनच अनेकजण हा व्हिडीओ शेअर करताहेत.