सिनेसृष्टीही करोनाच्या विळख्यात अडकली आहे. बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार करोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
View this post on Instagram
मराठी मालिकांमधील कित्येक कलाकारांना एकामागोमाग एक करोनाची लागण झाली आहे. आता “लागिर झालं जी’ फेम शितली म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर हिला करोनाची लागण झाली आहे.
View this post on Instagram
शिवानीने स्वतः तिच्या फेसबुक अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ही माहिती दिली. सर्व काळजी आणि खबरदारी घेऊनही, दुर्दैंवाने माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे शिवानी म्हणते.
View this post on Instagram
सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत, मी माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे. मी सर्वांना विनंती करते की कृपया खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा. सुरक्षित राहा आणि निरोगी राहा. असे आवाहन शिवानीने या पोस्टमधून केले आहे.