Shivani And Ambar | अभिनेत्री शिवानी सोनार ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिनेता अंबर गणपुलेशी लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. गेल्यावर्षी दोघांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.
या दोघांचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला आहे. अंबर आणि शिवानी या दोघांनी मेहंदी सोहळ्यातील सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय या दोघांच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक सुद्धा इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्यात आली आहे. अंबर आणि शिवानी येत्या २१ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्रीने तिच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. Shivani And Ambar |
अंबर-शिवानीच्या कामाबद्दल सांगायचं झाल तर, दोघांनीही अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. शिवानीने या आधी कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत काम केलं होतं. तर अंबरने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तो कलर्स मराठीवर’ दुर्गा’ या मालिकेत देखील दिसला. Shivani And Ambar |