पुणे: द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्डस अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (बीएसएएम) यांच्या संलग्नतेने बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धेत माजी सिक्स रेड स्नूकर विजेता पुण्याचा शिवम अरोरा याने मुंबईच्या मानव पांचाळचा 7-4 (35-33, 51-11, 65-00, 39-17, 22-33, 22-38, 48-18, 28-42, 23-30, 36-10, 41-04) असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
पूना क्लब येथील बिलियर्डस हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात पुण्याच्या शिवम अरोरा याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित मुंबईच्या मानव पांचाळ याचा 7-4 (35-33, 51-11, 65-00, 39-17, 22-33, 22-38, 48-18, 28-42, 23-30, 36-10, 41-04) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
2 तास 40 मिनिटे चाललेल्या सामन्यात शिवम याने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. सामन्यात 4-0 अशा फरकाने आघाडीवर असताना मानवने सुरेख खेळ करत पिछाडी भरून काढली व त्यामुळे सामन्यात 5-4 अशी स्थिती झाली. पण त्यानंतर मानव याने केलेल्या चुकांचा फायदा घेत शिवमने पुढील दोन्ही फ्रेम जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.