#Video: शिवजयंतीनिमित्त विश्वविक्रमी महारांगोळी 

सांगली – शिवजयंतीनिमित्त तब्बल सव्वालाख चौरस फुटाची महारांगोळी साकारत छत्रपती शिवाजी महाराजांना आगळे-वेगळे अभिवादन करण्यात आले आहे. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ही रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीच्या माध्यमातून शिवराज्यभिषेकचा इतिहास पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. या महारांगोळीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या महारांगोळीला १६ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली होती. यासाठी जिल्ह्यातील तब्बल १०० कलाशिक्षक मैदानात उतरले होते. व अवघ्या ७५ तासात २५० बाय ५५० फुटाची ही विश्वविक्रमी रांगोळी पूर्ण करण्यात आली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल ३० टन रांगोळी आणि ५ टन विविध रंगाचा वापर करण्यात आला. यासाठी तब्बल ३० लाख खर्च आला आहे. यावेळी  ‘जय भवानी ,जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, या घोषणांनी स्टेडियम दुमदुमून गेले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.