पुणे- चाकण एमआयडीसी मध्ये अडीच लाख कामगार असून त्यांना रेशनकार्ड मिळावे व त्याद्वारे त्यांना राशन मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
करोना विषाणूच्या महामारीचा जिल्ह्यात आणि राज्यात प्रादुर्भाव झाला आहे या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार शिवराजीराव आढळराव पाटील यांनी खेड पंचायत समितीमध्ये सभापती, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकार यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अमर कांबळे,ज्योती अरगडे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे उपस्थित होते.
दरम्यान, आरोग्य कर्मचारी यांचे वेतन काही कारणांमुळे अडकले आहे, तेही सगळ्यांना मिळेल, असा विश्वास त्यांंनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला आहे.