आढळरावांची खिलाडूवृत्ती : शिरूरसह राज्यभरात कौतुक

निकाल जाहीर होताच डॉ. अमोल कोल्हेंचे अभिनंदन आणि शुभेच्छा

पिंपरी – शिरूर लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढाईत राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. सलग तीन वेळा विजयी ठरलेल्या आढळराव पाटलांसाठी हा पराभव धक्कादायक असला तरी त्यांनी निकाल जाहीर होताच पराभव मान्य करीत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले. अभिनंदन आणि शुभेच्छा देणाऱ्या पोस्टमध्ये “खासदार’ अमोल कोल्हे असा उल्लेख करत त्यांचा मोठा फोटो टाकला आणि खाली स्वतःचा लहान फोटो टाकत ही पोस्ट केली.

प्रचारा दरम्यान एकमेकांवर आरोपांचे आसूड उगारणाऱ्या नेत्यांनी निवडणुकीनंतर प्रगल्भता आणि मोठेपणा दाखवावा, अशीच जनेतची अपेक्षा असते. या अपेक्षे अनुरूपच आढळरावांनी दाखवलेली ही राजकीय प्रभल्गता आणि खिलाडूवृत्तीचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही राज्यभरात कौतुक केले.

शिरूर व पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी होऊन आता चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा विजयी रथ पहिल्यांदाच शिवसेनेतूनच राष्ट्रवादीमध्ये आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी रोखला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढाईत दोन्ही उमेदवारांनी प्रचारादरम्यान एकमेकांवर टिकेची राळ उडवली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढाईत डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा 60 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला.

जिव्हारी लागणाऱ्या या पराभवानंतरही आढळराव पाटलांनी खुल्या मनाने डॉ. अमोल कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमोल कोल्हे यांना निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा असा मजकुर डॉ. अमोल कोल्हे यांच्या फोटो सहित त्यांनी त्यांचे फेसबूक पेजवर शेअर केला आहे. आढळरावांनी खुल्या मनाने पराभव स्विकारुन विजयी उमेदवाराला शुभेच्छा दिल्याने त्यांचे शिरुर मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात कौतुक होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)