स्वच्छतागृहाचे रूप पालटणार

पुणे – शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात असलेल्या स्वच्छतागृहांचे रूपडे आता पालटणार असून ते लवकरच वापरायोग्य करण्यात येणार आहे. त्यामुळे आता न्यायालयातील दुर्गंधीदेखील कमी होणार आहे. स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक राजेंद्र रहाणे यांनी विशेष दुरुस्ती अंतर्गत न्यायालयासाठी निधी मंजूर केले आहे. या निधीच्या माध्यमातून सिव्हील इमारतीमधील बाररूम, स्मॉल कॉसमधील बाररूम आणि नवीन इमारतीमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील पुरूषांचे 5 आणि महिलांच्या 4 स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून त्यानंतर कामकाज सुरू होणार आहे. किमान ऑगस्ट अखेर काम सुरू होईल, अशी माहिती न्यायालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखेकडून देण्यात आली.

सध्या जिल्हा न्यायालयात रेल्वे कॅन्टीन आणि अगरवाल कॅन्टीनजवळ असलेल्या कैद्यांच्या लॉकरशेजारी कॉमन स्वच्छतागृहे आहेत. तसेच चारही इमारतीत विविध ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत. मात्र, त्यातील अनेक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. वेळच्या वेळी साफसफाई नसल्याने नवीन इमारतीमधील अनेक स्वच्छतागृहांमधून दुर्गंधी येते. न्यायालयाच्या पोर्चमध्ये फिरत असताना पक्षकार आणि वकिलांना अगदी नाक दाबून या ठिकाणांहून ये-जा करावे लागत असल्याची स्थिती काही दिवसांपूर्वी निर्माण झाली होती. त्यामुळे लवकरात लवकर स्वच्छतागृहे सुधारावीत, अशी मागणी होत होती. निधी मंजूर झाल्याने आता न्यायालयात येणाऱ्या सर्वांनाच दिलासा मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)